Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलिस आयुक्तांच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट; आरोपी निघाला राजस्थानचा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पोलिस आयुक्तांच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट; आरोपी निघाला राजस्थानचा

admin
Last updated: 2025/05/03 at 6:38 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 3 मे (हिं.स.)

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट बनवून काहींना पैसे मागण्यात आल्याची धक्कादायक बाब येथे उघड झाली. सायबर पोलिसांनी बनावट अकाउंट बनविणाऱ्या भामट्याची ओळख पटविली असून, तो राजस्थानचा असल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे.

राजस्थानच्या त्या सायबर भामट्याने सीपींच्या नावाने बनावट अकाउंट बनवून शहरातील काहींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तथा चॅटिंग करून काहींना रक्कमदेखील मागितली. त्यातील काहींना सीपींशी संपर्क करून शहानिशा केली असता, हा तोतयेगिरीचा प्रकार उघड झाला. सुत्रानुसार, ३० एप्रिल रोजी शहरातील चार ते पाच व्यक्तींना त्या बनावट अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आल्या, तर काहींना मेसेज आले आहेत. काहींनी प्रत्युत्तरात फाइन सर, असा प्रतिसाद दिल्याने आरोपीने काहींना मोबाइल नंबर मागितले. त्या भामट्याने स्वतःला सीपी नवीनचंद्र रेड्डी असे संबोधत आपल्या सीआरपीएफमधील संतोषकुमार नामक मित्राची बदली झाल्याने त्याला घरातील फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन विकायची असल्याची बतावणी केली. काहींना शंका आल्याने त्यांनी ती बाब सीपी नवीनचंद्र रेड्डी यांच्या कानावर घातली. सीपींनी तत्काळ सायबर पोलिसांना सुचित केले.

सोशल मीडियावर अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट तयार करून त्या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक केली जाते. तसाच प्रकार दोन दिवसांपूर्वी माझ्या नावाने उघड झाला. आरोपी राजस्थानचा असल्याचे समोर आले आहे.नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त.

—————

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तहसीलदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी डॉ किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात
Next Article मंत्रीमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीचा विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतला आढावा

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?