Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “दहशतवाद्यांच्या पोशिद्यांवर निर्णायक कारवाई करू”-पंतप्रधान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

“दहशतवाद्यांच्या पोशिद्यांवर निर्णायक कारवाई करू”-पंतप्रधान

admin
Last updated: 2025/05/03 at 6:42 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 03 मे (हिं.स.) : दहशतवाद मानवतेसाठी घातक असून दहशतवादाच्या पोशिंद्यांवर ठोस आणि निर्णायक कारवाईचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी केला. अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष लॉरेन्को यांच्याशी हैदराबाद हाऊस येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर मोदी बोलत होते.

यावेळी मोदींनी म्हणाले की, अंगोलाचे राष्ट्रपती 38 वर्षांनी भारत दौऱ्यावर आले आहेत, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्यांच्या या भेटीमुळे भारत-अंगोला संबंधांना नवी दिशा मिळत आहेच, शिवाय भारत-आफ्रिका भागीदारीही बळकट होत आहे. यावर्षी भारत आणि अंगोला राजनैतिक संबंधांचा 40 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. पण आमचे नाते त्यापेक्षा खूप जुने आहे. जेव्हा अंगोला स्वातंत्र्यासाठी लढत होता, तेव्हा भारतही पूर्ण विश्वासाने आणि मैत्रीने उभा राहिल्याचे मोदींनी सांगितले. अंगोलाच्या सैन्याच्या आधुनिकीकरणाला पाठिंबा देण्यासाठी 200 दशलक्ष डॉलर्सची संरक्षण क्रेडिट लाइन मंजूर करण्यात आल्याची घोषणा मोदी यांनी केली. अंगोलासोबत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, अंतराळ तंत्रज्ञानातील अनुभव शेअर केला जाईल. आरोग्यसेवा, हिरे प्रक्रिया, खते आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रात दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याचे मोदी म्हणाले.

दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे यावर आमचे एकमत आहे. दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अंगोलाला आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात ‘आफ्रिकन युनियन’ला जी-20 चे कायमचे सदस्यत्व मिळाले हे अभिमानाची गोष्ट असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंत्रीमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीचा विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतला आढावा
Next Article सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उडान उपक्रम यशस्वी करावा – सोलापूर जिल्हाधिकारी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?