Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा – रामदास आठवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा – रामदास आठवले

admin
Last updated: 2025/05/04 at 6:11 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 4 मे (हिं.स.)।

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील फुले सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे.जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे. त्यासाठी फुले चित्रपट हा देशभरात टॅक्स फ्री झाला पाहिजे अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

अंधेरी येथे रामदास आठवले यांच्या साठी फुले सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग दाखवण्यात आले.फुले चित्रपट पाहिल्यानंतर आठवले यांनी हा चित्रपट देशभरात पोहोचला पाहिजे.त्यासाठी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित व्हावा आणि फुले या चित्रपटाला करमुक्त करावे अशी आपली मागणी असून त्या बाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली.

यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कुडेचा रिपाइंचे शैलेश भाई शुक्ला; जतीन भुट्टा; प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले हा सिनेमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनात दाखवण्यात यावा अशी विनंती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रामदास आठवले यांना केली. त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.फुले सिनेमा सर्व सिनेमागृहात दाखवण्यात यावा. सर्वांनी फुले सिनेमा जरूर पाहावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले.

फुले चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी मुख्य भूमिका केलेली आहे.फुले सिनेमा मध्ये महात्मा फुले यांचे जीवनकार्य त्यांचे क्रांतिकारी योगदान अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात आले आहे, असे कौतुक रामदास आठवले यांनी केले.

You Might Also Like

अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी

पंजाब : मजिठा रोडवर बॉम्बस्फोट , एक जखमी

पंतप्रधान मोदी सिंदूरची लाली कायम ठेवतील!

इंडिगोचे संस्थापक गंगवाल 3.4 टक्के भांडवल विकणार

कर्नाटक : भाजपच्या 2 आमदारांची पक्षातून हकालपट्टी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जम्मू काश्मीर: लष्कराचा ट्रक दरीत कोसळून ३ जवान हुतात्मा
Next Article पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याने बनवले बंकर, वॉर सायरन आणि लोकांना घरे खाली करण्याचे आदेश

Latest News

राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
Top News May 28, 2025
अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी
देश - विदेश May 28, 2025
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
महाराष्ट्र May 28, 2025
देशात कोरोनाचे १०४७, तर राज्यात ६६ नवीन रुग्ण
महाराष्ट्र May 28, 2025
कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटमुळे अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू
महाराष्ट्र May 28, 2025
मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; बॅगेत सापडली चिठ्ठी
महाराष्ट्र May 28, 2025
राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
महाराष्ट्र May 28, 2025
शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर बसणार महागाईची झळ
महाराष्ट्र May 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?