Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आंदोलनाला वारक-यांनी फिरवली पाठ; वंचितच्या कार्यकर्त्यांचा शिवाजी चौकात भजन आंदोलन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आंदोलनाला वारक-यांनी फिरवली पाठ; वंचितच्या कार्यकर्त्यांचा शिवाजी चौकात भजन आंदोलन

Surajya Digital
Last updated: 2020/08/31 at 12:25 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर : विठ्ठल मंदिर दर्शनासाठी सुरु करा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेने आज सोमवारी आंदोलन सुरु केले आहे. माञ या आंदोलनात प्रमुख महाराज मंडळी अनुपस्थित असल्याने वारक-यांनी देखील या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. माञ राज्यभरातून आलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून शिवाजी चौकात भजन आंदोलन सुरु केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सकाळी आठ वाजल्यापासून आंदोलक जमण्यास सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पोलीस अधीक्षक मनोज पाटील पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. शासनाचे प्रतिनिधि म्हणून आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सागर कवडे पो. नि. अरुण पवार हे शिवाजी चौक, मंदिर परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस प्रशासन ड्रोन कॅमेराद्वारे प्रत्येक घटना कैद करीत आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे सकाळीच पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. माञ दुपारी बारा वाजेपर्यंत ते आंदोलनस्थळी दाखल झाले नव्हते. यामुळे आंदोलक शिवाजी चौकात भजन आंदोलन करीत आहेत. एक लाख वारक-यांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. माञ अंदाजे एक हजार आंदोलकांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरु आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #पंढरपूर #वंचित #मोर्चा #वारकरी #पाठ #फिरवली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहिली महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर एस आय पद्मावती यांचे निधन; ‘कार्डिओलॉजीची गॉडमदर’ पदवी बहाल
Next Article आनंद वार्ता : उजनी धरण 100 टक्के भरले; उजनीवरील बारा धरणात झपाट्याने वाढ, बंधा-याचे काम घेतले हाती

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?