Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताविरोधात तुर्कीची पाकिस्तानला साथ, कराचीला पाठवली युद्धनौका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारताविरोधात तुर्कीची पाकिस्तानला साथ, कराचीला पाठवली युद्धनौका

admin
Last updated: 2025/05/06 at 2:01 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लाहोर , 6 मे (हिं.स.)।पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकते असा दावा पाक मंत्री करत असताना तुर्कीने भारताविरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. तुर्कीने पाकिस्तानच्या कराची पोर्टवर त्यांच्या नौदलाची युद्धनौका उभी केली आहे. ज्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने तुर्कीला मदत केली, त्यांनीच पाकच्या कराची पोर्टला युद्धनौका आणून उभी केली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने मिलिट्री प्लेनने पाकिस्तानला युद्ध साहित्य पाठवले होते. त्यानंतर आता कराची पोर्टवर त्यांच्या नौदलाची युद्धनौका उभी केली आहे. एंटी सबमरीन तंत्रज्ञानाच्या या तुर्कीश शिपचं नाव TCG BUYUKADA असं आहे. ही युद्धनौका कराचीला पोहचताच पाकिस्तानी सैन्य खुश झाले आहे. तुर्किश युद्धनौका दोन्ही देशातील नौदलाला सागरी सहकार्य करेल असं पाक नौदलाने म्हटलं. तुर्की देशाने आजपर्यंत कायम पाकिस्तानची बाजू घेतली आहे. कराचीत तुर्की नौदलाचे अधिकारी पाकिस्तानी सैनिकांसोबत संवाद साधतील.

माहितीनुसार, तुर्की आणि पाकिस्तानी नौदल एकत्रितपणे युद्धसराव करणार आहेत. २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव वाढला आहे. त्यात अरबी समुद्रात दोन्ही देशांनी नौदलाचा अभ्यास केला. आता तुर्की उघडपणे पाकिस्तानसोबत उभा राहिला आहे. त्यामुळे पुढील काळात भारत आणि तुर्की यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तुर्कीविरोधात कठोर निर्णय घ्यावेत अशी मागणी आतापासून होऊ लागली आहे. एका रिपोर्टनुसार, तुर्की पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा सैन्य शस्त्राचा पुरवठा करणारा देश आहे. तो ड्रोन, युद्धनौका, एंटी टँक मिसाईलसह पाकिस्तानला F16 अपडेट करण्यास मदत करत आहे.

दरम्यान, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनीही पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सूरात सूर मिसळले आहेत. याआधीही मलेशियाने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरून पाकिस्तानला साथ देत भारतावर टीका केली होती. त्यावेळी भारताने मलेशियातून ऑयल आयात घटवले, त्याचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर झाला. भारताने धडा शिकवल्यापासून मलेशियाने काही वर्ष काश्मीरवर मौन बाळगले परंतु आता त्याने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी या पाकिस्तानी मागणीला मलेशियाचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येते.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला तरुणीवरील अत्याचार प्रकरणी अटक
Next Article सातपुड्याच्या पायथ्याशी शाहपूर जंगलात गर्भवती वाघिणीचा संशयास्पद मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?