Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानात 9 ठिकाणी ‘एअर स्ट्राईक’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानात 9 ठिकाणी ‘एअर स्ट्राईक’

admin
Last updated: 2025/05/07 at 4:10 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दिले सडेतोड प्रत्युत्तर

नवी दिल्ली, 07 मे (हिं.स.) : भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर 1.44 वाजता हवाई हल्ला केला. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तय्यबा या जिहादी दहशतवादी संघटनांची मुख्यालये देखील नष्ट करण्यात आली.

संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केले. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बहावलपुर, मुरीदके, गुलपुर, भीमबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट, मुजफ्फराबाद याठिकाणी जोरदार हवाई हल्ले चढवले. रात्री 1.44 वाजता हा स्ट्राईक करण्यात आला.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की आमची कारवाई केंद्रीत,स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्ध्वस्त करण्यात संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 हिंदूंचे टार्गेट किलींग करण्यात आले होते. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रात्रभर ऑपरेशन ‘सिंदूर’वर सतत लक्ष ठेवून होते. या कारवाई अंतर्गत एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आणि सर्व हल्ले पूर्णपणे यशस्वी झाले.

दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर देशाच्या अनेक भागांमध्ये विमान उड्डाणं रद्द करण्यात आली किंवा उशिराने उड्डाणं झाली. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने 7 मे रोजी दुपारपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत.—

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑपरेशन सिंदूरसाठी शरद पवारांकडून अभिनंदन
Next Article ‘भारताबरोबर युद्ध करण्याची हिम्मत पाकिस्तानने दाखवू नये’- अमेरिका परराष्ट्र मंत्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?