Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, ६ जणांचा मृत्यू तर 1 जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, ६ जणांचा मृत्यू तर 1 जखमी

admin
Last updated: 2025/05/08 at 2:43 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

देहरादून, 8 मे (हिं.स.)।उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या चारधाम यात्रेदरम्यान आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होऊन अपघात घडला आहे. या हेलिकॉप्टरमधून ७ जण प्रवास करत होते. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये मुंबईतील ४ आणि आंध्र प्रदेशमधील एकाचा समावेश आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरने डेहराडूनमधील सहस्त्रधारा हेलिपॅडवरून उड्डाण केले होते. ते यमुनोत्री मंदिराजवळील खरसाली हेलिपॅडकडे जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात पायलट कॅप्टन रॉबिन सिंह (गुजरात) यांचा मृत्यू झाला आहे.तर मुंबईतील चार यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून कला सोनी (६१), विजया रेड्डी (५७), रुची अग्रवाल (५६) आणि राधा अग्रवाल (७९) अशी त्यांची नावे आहेत. तर आंध्र प्रदेशातील वेदवती कुमारी (४८) यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. तर आंध्र प्रदेशमधील भास्कर (५१) हे गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी एअरलिफ्ट करून ऋषिकेश येथील एम्समध्ये नेण्यात आले.

या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, उत्तरकाशीतील गंगनानीजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. ही दुःखद घटना आहे. मदत आणि बचावकार्यासाठी एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच

या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या संदर्भात, आपण अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण एका गावाजवळील डोंगराच्या कडेला २००-२५० मीटर खाली दरीत आहे. एसडीआरएफ, लष्कर आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘भारताने सांडलेल्या रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेणार’- शाहबाज शरीफ
Next Article भारतीय कांदा उत्पादक पाकिस्तानवर करणार सर्जिकल स्ट्राइक, निर्यातवाढीमुळे पंधरा दिवसात भाव वाढणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?