Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मसुद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

मसुद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर ठार

admin
Last updated: 2025/05/09 at 7:33 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

लाहोर , 9 मे (हिं.स.)।आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार आणि जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर अब्दुल रौफ अझहर हा भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरद्वारे केलेल्या क्षेपणाशस्त्र हल्ल्यात ठार झाला आहे.

पाकिस्तानच्या बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर केलेल्या माऱ्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य ठार झाले, तर त्याचा धाकटा भाऊ अब्दुलही गंभीर जखमी झाला होता. त्याचाही मृत्यू गुरुवारी(दि.८) झाल्याचे समजतं आहे.अब्दुल रौफ अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा सर्वोच्च कमांडर होता. त्याने २१ एप्रिल २००७ रोजी संघटनेच्या नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली. तो पाकिस्तानातील देवबंदी जिहादी मौलवी आणि दहशतवादी होता. भारतात विविध दहशतवादी हल्ल्यांचे कट रचल्यामुळे तो अनेक गुन्ह्यांसाठी भारतीय तपास यंत्रणांना हवा होता.

अब्दुल रौफ अझहरने १९९९मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ विमानाचे अपहरण करण्याचा कट रचला होता. त्याद्वारे आपला मोठा भाऊ मसूद अझहरला सोडविण्यात त्याला यश आले होते. त्यानंतर भारतात जैश-ए-मोहम्मदने केलेल्या सर्व मोठ्या हल्ल्यांमागे अब्दुल रौफ अझहरचा हात आहे.२००१ साली जम्मू-काश्मीर विधानसभेवर व भारतीय 3 संसदेवर झालेले आत्मघाती हल्ले, २०१६ चा पठाणकोट हवाई तळावरील हल्ला, नगरोटा, कठुआतील लष्करी छावणींवरील मारा, २०१९चा पुलवामा आत्मघाती हल्ला यांच्या मागे अब्दुलचा हात होता.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नौदलाच्या ताफ्यात ‘अर्नाळा’ पहिली पाणबुडी विरोधी युध्‍दनौका दाखल
Next Article सोलापूर जिल्ह्यात 16 गावांत टँकरने पाणी

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?