Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारत- पाकिस्तान युद्धबंदीनंतर आयपीएल पुन्हा सुरु होणार का?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारत- पाकिस्तान युद्धबंदीनंतर आयपीएल पुन्हा सुरु होणार का?

admin
Last updated: 2025/05/11 at 4:22 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 11 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.पण आता दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली आहे.१२ मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ यांच्याच चर्चा होणार आहे. त्यामुळे सध्यातरी युद्धविराम लागला आहे.अशात आता एकच आठवड्यांसाठी आयपीएल स्थगित झाल्याने पुन्हा बीसीसीआय उर्वरित आयपीएल लगेचच सुरू करणार का? असा प्रश्न आहे.

आयपीएल स्थगित झाल्यानंतर परदेशी खेळाडू आपापल्या मायदेशी परतले आहे. भारतीय खेळाडू देखील त्यांच्या घरी गेले आहेत. त्यामुळे जर आता पुन्हा आयपीएल लगेचच येत्या आठवड्यात सुरू करायंच झाल्यास पुन्हा प्रत्येक फ्रँचायझीला आपल्या संघाला एकत्र करावे लागणार आहे. हे मोठे आव्हान दोन्ही संघांसमोर असणार आहे. इतकेच नाही, तर आयपीएल २०२५ नंतरचे क्रिकेटचे वेळापत्रकही व्यग्र होते. २५ मे रोजी आयपीएल २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना होणार होता. त्यानंतर भारतीय कसोटी संघाला २० जूनपासून इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडला जाणे अपेक्षित आहे.

तसेच या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडमध्ये भारतीय अ संघ प्रथम श्रेणी सामने खेळणार होता. अशात आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवडा जरी पुढे गेली, तरी पुढील सर्व वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशात आता आयपीएलच्या आयोजनाबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, ८ मे रोजी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आल्यानंतर भारताकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्याच दरम्यान पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाळा येथे सामना सुरू होता. मात्र हा सामना १०.१ षटकानंतर रद्द करण्यात आला होता.सामना सुरू असतानाच अचानक आधी सामना थांबवण्यात आला आणि त्यानंतर फ्लडलाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर खेळाडू, प्रेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सुखरुप स्टेडियमबाहेर काढण्यात आले होते.

त्यानंतर ९ मे रोजी बीसीसीआयने जाहीर केले होते की सुरक्षेच्या कारणाने एक आठवड्यासाठी आयपीएल स्थगित केले जात आहे. यानंतर खेळाडू आपापल्या घरी परतले होते. पण आता असे समोर आले आहे की १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धविराम लागला आहे.त्यामुळे आता आयपीएल चालू होणार की नाही यावर बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहणे लागणार आहे.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकिस्तानात भयावह स्थिती, बांगलादेशच्या खेळाडूने आणली समोर
Next Article बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?