Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी

admin
Last updated: 2025/05/11 at 4:35 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

ढाका , 11 मे (हिं.स.)।बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांच्या अवामी लीग वर बंदी आणली आहे.त्यामुळे आता अवामी लीग ला आगामी निवडणुकीत सहभागी होण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शनिवारी(दि.१०) पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घालण्याची घोषणा केली, असे वृत्त आहे. आता अवामी लीग त्यांच्या नावाने आणि चिन्हाने निवडणूक लढवू शकणार नाही. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने घेतलेला निर्णय शेख हसीना आणि त्यांच्या समर्थकांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत ‘अवामी लीग’वर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केली. यासंदर्भातील अधिकृत राजपत्र अधिसूचना पुढील लवकरच जारी केली जाणार आहे. तसेच एका निवेदनात असे म्हटले आहे की, देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या हितासाठी बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अवामी लीग आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध खटला पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू राहील.

दरम्यान, मोहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या बंदीचा निर्णय घेण्यात आला. आयसीटी कायद्यात सुधारणा करून न्यायाधिकरणाला कोणत्याही राजकीय पक्षावर, त्यांच्या आघाडीच्या संघटनांवर आणि संलग्न संस्थांवर खटला चालवण्याची परवानगी देण्यात आली.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारत- पाकिस्तान युद्धबंदीनंतर आयपीएल पुन्हा सुरु होणार का?
Next Article ऑपरेशन सिंदूर’च्या पोस्टरच्या टिकेनंतर दिग्दर्शकाने मागितलली माफी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?