Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 27320 प्रकरणे सामंजस्याने निकाली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 27320 प्रकरणे सामंजस्याने निकाली

admin
Last updated: 2025/05/12 at 6:14 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर, 12 मे (हिं.स.)।

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये सन 2025 मधील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून 27 हजार 320 इतकी प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणामधील तडजोडी मुल्य 1,49,18,63,016 (एकशे एकोणपन्नास कोटी अठरा लाख त्रेसष्ट हजार सोळा ) इतके राहीले. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एकुण 31 जोडप्यांचे वैवाहिक हक्क सामंजस्याने पुर्नस्थापित झाले.

सन 2025 मधील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर मनोज शर्मा यांच्या उपस्थितीतध्ये संपन्न झाले.

याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश आर.जे.कटारिया, जिल्हा न्यायाधीश वाय.ए.राणे, जिल्हा न्यायाधीश जे.जे.मोहिते, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस.व्ही.केंद्रे, जिल्हा सहकारी वकिल प्रदिपसिंग रजपूत, सोलापूर वकिल संघाचे अध्यक्ष व्ही.पी.शिंदे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधिर खिराडकर, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक मुकुंद ढोबळे, तसेच इत्तर न्यायधीश विधिज्ञ आणि पक्षकार उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सोलापूर महानिगरपालिकेतील सहाय्यक मुख्य निरिक्षक करसंचलन अधिकारी युवराज गाडेकर, कर निरक्षक दिलीप देशमुख, कार्यालयीन अधिक्षक सुर्यकांत खसगे व बैंक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री बैंकेचे विधिज्ञ एस.एस.गायकवाड, व रिकव्हरी अधिकारी आदित्य गवळी व बैंक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर संजिव कुमार व बैंकेचे विधिज्ञ व्ही. ए. कुलकर्णी यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिवानी न्यायाधीश विरिष्ठ स्तर एम.के.कोठुळे यांनी केले.

सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय अदालतीच्या माध्यमातून एकुण 4 हजार 916 प्रलंबित प्रकरणे दाखल केली व 22 हजार 404 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व प्रकरणामधील तडजोड मुल्य 1,49,18,63,016 (एकशे एकोणपन्नास कोटी अठरा लाख त्रेसष्ठ हजार सोळा ) इतके राहिले.

सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्हा येथील सर्व न्यायालयांमध्ये 15 वर्षे जुनी 01, 10 वर्षे जुनी 11, 5 वर्षे जुनी 951 अशी एकुण 963 जुनी प्रकरणे निकाली काढण्यात आली.

राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनापुर्वी 5 ते 9 मे या कालावधीमध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये 15 वर्षे जुनी 9, 10 वर्षे जुनी 46, 5 वर्षे जुनी 527 अशी एकुण 4 हजार 82 इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हवाई वाहतूक क्षेत्रात तरुणांना संधी – मुरलीधर मोहोळ
Next Article crime सोलापूर : पोलिस कारवाईच्या बहाण्याने दागिने लंपास

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?