सोलापूर, 12 मे (हिं.स.)।
अज्ञात कारणावरून एका २२ वर्षीय तरुणाने घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कराडवाडी कोळा (ता. सांगोला) येथे घडली आहे. वैभव तानाजी आलदर (२२ वर्षे, रा. कराडवाडी, कोळा, ता. सांगोला) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
कराडवाडी, कोळा (ता. सांगोला) येथील २२ वर्षीय तरुण वैभव तानाजी आलदर याने अज्ञात कारणावरून घरासमोरील शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. त्यास उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.