Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री

admin
Last updated: 2025/05/13 at 5:20 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वर्धा, 13 मे (हिं.स.)।

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलेच सोबतच अनेक क्रांतीकारक तयार केले. दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा एकत्रित झालेला स्वातंत्र्य इतिहासातला एकमेक नायक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, अशा थोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वर्धा येथे उभारलेल्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीलाही प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅचलर रोड वर्धा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानास भेट दिली व त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सुमीत वानखेडे, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्याम देशपांडे, हरीभाऊ वझूरकर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची विज्ञान निष्ठता आपल्याला नवीन पिढीमध्ये रुजवता आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न सर्वांनी मिळूण करणे गरजेचे आहे. सावरकरांनी भारताच्या जाती भेदाविरुध्द उभारलेला लढा, त्यांनी जाती उच्छेदक लिहलेली निबंध आणि त्यातून पतित पावन मंदीर तयार करुन समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. समाजातील जातीव्यवस्था संपली पाहिजे, त्याकरिता त्यांनी केलेले काम त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वपूर्ण कार्य आहे. त्यांचे करागृहातील जीवन माझी जन्मठेप यामध्ये आपल्या वाचायला मिळते. त्यांच्यामध्ये किती कणखरपणा होता हे पहायला मिळते, मराठीला अभिजात दर्जा मिळाला त्या मराठीला सगळे महत्वाचे शब्द, भाषा शुध्दी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन कार्यावर आधारित शिल्प प्रदर्शनीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. या स्मरणिकेमध्ये राज्यातील प्रसिद्ध लेखकांचे लेख, सामाजिक संस्थेद्वारे राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमांचे छायाचित्र आदींचा समावेश आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री
Next Article ‘कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास – मुख्यमंत्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?