Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान मोदी अचानक पोहोचले आदमपूर एअरबेसवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी अचानक पोहोचले आदमपूर एअरबेसवर

admin
Last updated: 2025/05/13 at 5:42 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 13 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी(दि.१२) देशाला संबोधित केले.यावेळी त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.त्यानंतर आता आज, मंगळवारी (13 मे) पहाटे पंतप्रधान मोदी अचानक आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी लष्कराच्या जवानांची भेट घेऊन ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधानांसोबत एअर चीफ मार्शल एपी सिंग देखील उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आदमपूर एअरबेसस येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सैनिकांशी 6 मे च्या रात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दलही चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट देणे खूप खास मानले जात आहे. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानने हा एअरबेस उडवल्याचा दावा केला होता. पण, आता स्वतः पीएम मोदी येथे पोहोचल्यामुळे पाकिस्तानच्या खोट्या दाव्याची पोलखोल झाली आहे. पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीचे काही फोटोही शेअर केले आहेत.

या बैठकीची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, “आज सकाळी एएफएस आदमपूरला भेट दिली आणि आपल्या शूर हवाई योद्ध्यांची भेट घेतली. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या जवानांसोबत वेळ घालवणे अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे, त्यासाठी भारत नेहमीच त्यांचे आभारी राहील.”दरम्यान, पाकिस्तानी सीमेजवळ असलेले आदमपूर एअरबेस शत्रूवर जलद हल्ला करण्यासाठी ओळखले जाते. आदमपूर एअरबेस हा भारताच्या लढाऊ विमान मिग 29 चा तळ आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहलगामच्या दहशतवाद्यांवर 20 लाखांचे बक्षीस जाहीर
Next Article निवृत्तीनंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत पोहचला प्रेमानंद महाराजच्या आश्रमात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?