पुणे, 13 मे (हिं.स.)।पिंपरी चिंचवडमध्ये एका १८ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी घडली होती. या प्रकरणी आता मोठे अपडेट समोर आले आहेत. दोघांमधील संबंध आणि आर्थिक व्यवहारांमधून परप्रांतीय असलेल्या शेजाऱ्यानेच हे कांड केल्याची माहिती उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी मामा-भाच्याला अटक केलीय.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमध्ये १८ वर्षांच्या कोमल भरत जाधव हिची हत्या झाली होती.
या प्रकरणी उदयभान जाधव आणि त्याच्या भाच्याला अटक केलीय. उदयभान हा मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती समजते.कोमल जाधव ही पिंपरी चिंचवडमध्ये वाल्हेकरवाडी परिसरात कुटुंबियांसह राहत होती. रविवारी कोमल घरी असताना शेजारी उदयभान जाधव याच्याशी वाद झाला. दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाल्यानंतर उदयभानने तिला संपवण्याचा कट रचला.