Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऑपरेशन सिंदूर’वर काँग्रेस आमदाराने उपस्थित केली शंका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ऑपरेशन सिंदूर’वर काँग्रेस आमदाराने उपस्थित केली शंका

admin
Last updated: 2025/05/16 at 4:33 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

बंगळूरू , 16 मे (हिं.स.)।’ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय लष्कराचे संपूर्ण देशासह जगभरातून स्वागत केलं जात आहे. मात्र, कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार कोथुर मंजुनाथ यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर शंका उपस्थित केली केली आहे.ऑपरेशन सिंदूर हे फक्त कारवाईचं ढोंग होतं, अद्याप पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळालेला नाही, असं वक्तव्य आमदार कोथुर मंजुनाथ यांनी केलं आहे.

ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार कोथुर मंजुनाथ म्हणाले, हे सर्व ढोंग होतं. काहीही झालेलं नाही. फक्त दिखाव्यासाठी तीन-चार विमानं पाठवून परत बोलावली. या कारवाईमुळे पहलगाममध्ये हत्या झालेल्या 26 लोकांना न्याय मिळेल का? ज्यांच्या घरातील लोक मारले गेले त्या महिलांचे दुःख कमी होईल का? त्याचा सन्मान करण्याचा हा मार्ग आहे का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी लष्कराच्या कारवाईवर शंका उपस्थित केली.

तसंच यावेळी आमदार मंजुनाथ यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारल्याच्या दाव्यावरही शंका व्यक्त केली. ते म्हणाले, “100 दहशतवादी मारले गेले हे निश्चितपणे माहिती आहे का? त्यांची ओळख काय आहे? मारले गेलेले दहशतवादीच 22 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात हल्ला करणारे होते का? दहशतवादी आत घुसले तेव्हा सीमेवर सुरक्षा का नव्हती? ते पळून कसे गेले? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.शिवाय आपण दहशतवादाची पाळेमुळे शोधून त्याचा नायनाट केला पाहिजे. हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणेचे पूर्ण अपयश असल्याचंही आमदार मंजुनाथ म्हणाले. दरम्यान, आम्ही कर्नाटक, पाकिस्तान, चीन किंवा बांगलादेश कुठल्याही नागरिकांविरुद्धच्या युद्धाविरोधात आहोत, असंही ते यावेळी म्हणाले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण – विखे पाटील
Next Article अ‍ॅपलचे भारतात उत्पादन करू नका म्हणणाऱ्या ट्रम्प यांना भारताचे प्रत्युत्तर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?