सोलापूर, 16 मे, (हिं.स.)।
सोलापूर-पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ मुंबईवरून बेंगलोर येथे जात असताना मालवाहक ट्रक क्रमांक KA 56 0403 ने पुण्याहून सोलापुरकडे जाणाऱ्या एका ट्रक क्रमांक MH 50 N 3089 या मालवाहक ट्रकला भरधाव वेगाने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.
या अपघातात धडक देणाऱ्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर होऊन कर्नाटक पासिंग असलेल्या ट्रकमधील ड्रायव्हर स्टेरिंग आणि ड्रायव्हर सीटच्यामध्ये अडकून दोन्ही पायांना जबर मार लागला. वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. गोरखनाथ लोंढे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील गस्तीपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातामध्ये ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या ट्रक चालकाला वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या आणि इतर वाहनचालकांच्या मदतीने ट्रकच्या बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली असून, वरवडे टोल वसुली येथील गस्थीपथक प्रमुख संतोष खडके यांनी दोन्हीही अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली