चीन,१६ मे (हिं.स.): चीनमध्ये आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. म्यानमार सीमेलगत जमिनीखाली १० किमी खोल असलेल्या भूकंपाच्या केंद्रावर ४.५ तीव्रतेचा भूकंप झाला.
भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याला दुजोरा दिला आहे. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी म्यानमारमध्ये ७ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने मोठं नुकसान केलं होतं, त्याची आठवण आज ताजी झाली आहे.
