सोलापूर, 17 मे (हिं.स.)।
जिल्ह्यातील पाणी पातळी घटल्याने 30 गावे, 212 वाड्या-वस्त्यांमधील 63 हजार 427 लोकांना 36 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात 21 टँकर सुरू होते. मात्र, पाण्याची टंचाई जाणवत असल्याने विविध तालुक्यांतून टँकरची मागणी आल्याने 15 टँकर वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध तालुक्यांत 36 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सध्या सांगोला तालुक्यातील दोन गावे, 16 वाड्या, मंगळवेढा तालुक्यातील तीने गावे, 21 वाड्या, करमाळा येथे तीन गावे, 23 वाड्या, माळशिरस येथे 14 गावे 152 वाड्या, दक्षिण सोलापूर तालुक्यात चार गावे, उत्तर सोलापूर तालुक्यात दोन गावे, अक्कलकोट तालुक्यात दोन गावे असे एकूण 30 गावे आणि 212 वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील पाण्याचे टँकर कमी होण्याची शक्यता आहे.