Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायमूर्ती गवई झाले नाराज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायमूर्ती गवई झाले नाराज

admin
Last updated: 2025/05/19 at 6:03 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 19 मे (हिं.स.)।सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी (दि.१८) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी प्रोटोकॉल पालन न झाल्याने गवई यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त हे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नसणे ही एक गंभीर बाब आहे. सरन्यायाधीश गवई यांनी न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यपालिका यांच्यातील परस्पर सन्मानावर भर दिला आहे.

सरन्यायाधीश गवई यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँन्ड गोवातर्फे आयोजित सत्कार समारंभाला हजेरी लावली होती. न्या. गवई मुंबईत पोहचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त अथवा कुणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. यावर नाराजी व्यक्त करताना गवई म्हणाले की, जेव्हा महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती देशाचे मुख्य न्यायाधीश होते आणि प्रथमच महाराष्ट्रात येते, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक किंवा मुंबई पोलीस आयुक्त यांना उपस्थित राहणे आवश्यक वाटत नसेल, तर त्यांनी याबाबत विचार करायला हवा.पुढ ते म्हणाले की, प्रोटोकॉलचे पालन करण्याचा आग्रह मी धरत नाही. इतक्या किरकोळ बाबींमध्ये पडायचे नसले तरी लोकांना त्याबाबत माहिती म्हणून नमूद करत आहे. माझ्या जागी अन्य कुणी असता तर राज्यघटनेचा अनुच्छेद १४२ चा वापर केला असता अशी तीव्र नाराजी सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केली.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या त्यांच्या आजाराबद्दल पंतप्रधान मोदींनी दिला धीर
Next Article विजय शहांचा माफीनामा फेटाळला, अटकेला स्थगिती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?