वॉशिंगटन , 21 मे (हिं.स.)।अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी, जर रशियाने रशिया-युक्रेन युद्धात औपचारिक युद्धबंदी प्रस्ताव सादर केला नाही तर अमेरिका त्यावर नवीन निर्बंध लादण्याचा विचार करू शकते.’ असे विधान केले आहे.त्यांनी हे विधान करत रशियाला थेट धमकीच दिली आहे. त्यांनी हे विधान अमेरिकन सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीसमोर केले.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी, “आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की रशिया युद्धबंदीसाठी आपल्या अटी लेखी स्वरूपात देण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे पुढील व्यापक चर्चा शक्य होईल. आम्ही त्या अटींची वाट पाहत आहोत, त्यानंतरच आम्हाला पुतिन यांचे हेतू चांगल्या प्रकारे समजू शकू.” असे म्हटले आहे.जर रशियाने शांतता चर्चेत रस दाखवला नाही तर अमेरिका नवीन निर्बंध लादेल का? असे रुबियो यांना विचारण्यात आले. ते म्हणाले, “जर हे स्पष्ट झाले की रशियाला शांतता नको आहे आणि ते युद्ध सुरू ठेवू इच्छित आहे, तर निर्बंधांचा मार्ग स्वीकारावा लागेल.”असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले आहे
तसेच, रुबियो यांनी असेही म्हटले आहे की, “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांची धमकी देऊ इच्छित नाहीत कारण त्यामुळे चालू असलेल्या राजनैतिक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.” तसेच “जर आता निर्बंध लादण्याची धमकी दिली गेली तर रशिया चर्चेतून बाहेर पडू शकतो, असे राष्ट्राध्यक्षांचे मत आहे,” रुबियो म्हणाले. रुबियो म्हणाले की ट्रम्प संघर्ष संपवण्यासाठी “पूर्णपणे वचनबद्ध” आहेत आणि दोन्ही बाजूंना शांततापूर्ण तोडगा काढण्याची क्षमता राखू इच्छितात.
ते पुढे म्हणाले की, ट्रम्प हे संघर्ष संपवण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत आणि दोन्ही पक्षांना शांततेकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवू इच्छितात. सोमवारी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी खुलासा केला की त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दोन तास फोनवर चर्चा केली, त्यानंतर रशिया आणि युक्रेनने ‘तात्काळ’ युद्धबंदी आणि शांतता चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शविली.त्यांनी असेही सांगितले की नवनिर्वाचित पोप लिओ चौदावा यांच्या नेतृत्वाखाली व्हॅटिकन या चर्चा आयोजित करण्यास तयार आहे. इस्तंबूलमध्ये अलिकडेच झालेल्या शांतता चर्चा अयशस्वी झाल्या असतानाही, दोन्ही देशांनी कैद्यांची देवाणघेवाण करण्यास सहमती दर्शविली असतानाही, हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे