Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इगतपुरीत जिंदाल कंपनीला लागलेली आग कायम, आजूबाजूची गावे केली खाली, महामार्गावरील वाहतूक देखील थांबविली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

इगतपुरीत जिंदाल कंपनीला लागलेली आग कायम, आजूबाजूची गावे केली खाली, महामार्गावरील वाहतूक देखील थांबविली

admin
Last updated: 2025/05/22 at 3:57 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

इगतपुरी, 22 मे (हिं.स.)।

– तालुक्यातील जिंदाल कंपनीला लागलेली आग मागील सुमारे 38 तासापासून कायम आहे त्यामुळे या ठिकाणी असलेल्या गॅसचा स्फोट होऊ नये यासाठी म्हणून प्रशासन प्रयत्न करीत असून खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूची सुमारे सात गावे ही खाली करण्यात आली आहेत. या ठिकाणी एनडीआरएफ ची तुकडी देखील मागविण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

बुधवारी पहाटे सर्वसाधारण दीड वाजेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव एमआयडीसी मध्ये असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म कपनीच्या रॉ मटेरियल ला लागलेल्या आजीने आता रुद्र रूप धारण केले असून मागील 38 तासापासून या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे नाशिक महानगरपालिकेसह ओझर, सैन्यदल, ओझर वायुदल, यासह भिवंडी पिंपरी चिंचवड संगमनेर अहिल्यानगर ज्या ठिकाणावरून देखील आगीचे बंब मागविण्यात आले होते सातत्याने काल सायंकाळपर्यंत ही आग नियंत्रणात येईल असा विश्वास प्रशासनाला वाटत असताना रात्री सर्व साधारण नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा ही आग भडकली आणि ती सातत्याने सुरू आहे.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत या ठिकाणी असलेल्या गॅसच्या टाकीचा स्फोट होण्याची शक्यता गृहीत धरल्यामुळे आजूबाजूच्या सुमारे सात पेक्षा अधिक गावे ही खाली करण्यात आलेली आहे नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक देखील काही काळ थांबविण्यात आलेली आहे.

या आगीत जिंदाल कंपनीतील एक पूर्ण प्लँट आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे. कंपनीमध्ये वापरले जाणारे पाणी अपुरे पडत असल्यामुळे इतर कंपन्यांकडूनही पाणी मागवले जात आहे.नाशिक महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे यांनी सांगितले की,सर्वात धोक्याची बाब म्हणजे कंपनीच्या आवारात LPG टाकी आहे. टाकीचे तापमान वाढू नये यासाठी सतत पाणी व फोमचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या टाकीला जर आग लागली, तर मोठा स्फोट होऊन गंभीर अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसतेय . आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जातायत. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन कामगार जखमी झाल्यास कळतंय . 30 ते 40 अग्निशमन दलाच्या गाड्या परिसरात दाखल झाल्या आहेत.

तब्बल 24 तास उलटल्यानंतरही आग आटोक्यात येत नसल्यामुळे आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) तुकडीची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील एनडीआरएफ बेस कॅम्पशी संपर्क साधण्यात आला असून, गुरुवारी पहाटे दोन वाजेपर्यंत एनडीआरएफची तुकडी जिंदाल कंपनीत दाखल होणार आहे. ही कंपनीत आग लागण्याची दुसरी वेळ आहे.

—————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच ! – डॉ. जयंत आठवले
Next Article पाकिस्तानला प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?