Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिका : हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

अमेरिका : हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री

admin
Last updated: 2025/05/23 at 1:39 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंगटन , 23 मे (हिं.स.)।अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर थेट गदा आणली आहे. गृह सुरक्षा विभागाने अर्थात होमलँड सिक्युरिटीने(डीएचएस ) घेतलेल्या निर्णयामुळे हार्वर्ड विद्यापीठाची परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता रद्द करण्यात आली आहे.

गृह सुरक्षा विभागाच्या माहितीनुसार, विद्यापीठाने ७२ तासांच्या आत सर्व परदेशी विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती अमेरिकन सरकारला द्यावी लागेल. सध्या या विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठे किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास सांगण्यात आले असून, असे न केल्यास या विद्यार्थ्यांना देश सोडावा लागू शकतो.आता या निर्णयाचा मोठा परिणाम हार्वर्डमध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्या अंदाजे ६८०० परदेशी विद्यार्थ्यांवर होणार आहे. यामध्ये भारतातील ७८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षात हार्वर्डमध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास २७ % विद्यार्थी परदेशातून आलेले होते.

ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय अचानक घेतलेला नसून, गेल्या काही आठवड्यांपासून हार्वर्ड विद्यापीठ आणि ट्रम्प प्रशासन यांच्यात परदेशी विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींच्या पार्श्वभूमीवर तणाव सुरू होता. प्रशासनाने यापूर्वीच ३० एप्रिलपर्यंत परदेशी विद्यार्थ्यांच्या संभाव्य बेकायदेशीर किंवा हिंसक प्रकरणांची माहिती सादर करण्याचा इशारा दिला होता. हार्वर्डने काही प्रमाणात माहिती दिली असली, तरी ती अपुरी असल्याने सरकार नाराज होते.

स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राम (SEVP) हे DHSच्या अखत्यारीत येते, आणि याच माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया पार पडते. SEVP प्रमाणपत्र रद्द झाल्यास, कोणतेही शिक्षणसंस्था परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाहीत, ज्याचा थेट परिणाम हार्वर्ड विद्यापीठावर झाला आहे.हा निर्णय उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. पुढील काही दिवसांत हार्वर्ड विद्यापीठ आणि अमेरिकी सरकार यामध्ये यावर तोडगा निघतो की तणाव वाढतो, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी – बावनकुळे
Next Article गुरुकुंजात तस्करांचा धुमाकूळ राष्ट्रसंतांच्या आश्रमातील चंदनाची झाडे कापली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?