अमरावती, 23 मे (हिं.स.)।
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. बुधवारी संध्याकाळी शहरासह ८ तालुक्यांमध्ये झालेल्या या मुसळधार अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ५० गावांचे शेती क्षेत्र उद्ध्वस्त केले आहे. या पावसामुळे सुमारे २५५.५ हेक्टर क्षेत्रातील ज्वारी, कांदा, भाज्या, तीळ, टरबूज, केळी, आंबा, संत्री, भुईमूग आणि इतर पिके बाधित झाली आहेत.
अवकाळी पाऊस घडकल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त १४ गावे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे. केळी, कांदा आणि ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.
१६ गावातील ९४ घरांचे नुकसान
या पावसामुळे जिल्ह्यातील १६ गावांमधील ९४ घरे कोसळली. यामध्ये अमरावती ४, धामणगाव रेल्वे १, धारणी ४, चिखलदरा ४, तिवसा १, नांदगाव खंडेश्वर २, दर्यापूर ६, भातकुली ४, अमरावती ९, मोर्शी ४ गावांचा समावेश आहेत. तिवसा १, चांदूर बाजार ८, चांदूर रेल्वे ५ आणि दर्यापूर येथील ६ गावांमधील पिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच धामणगाव रेल्वे, मोर्शी, धारणी येथे ११ गुरे मृत्युमुखी पडली आहेत.
—————