नांदेड : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे आज मंगळवारी सायंकाळी लिंगैक्य झाले आहेत. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरली आहे. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत, अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते. त्यातच आज मंगळवारी अप्पा लिंगेक्य झाले आहे
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला आहे. समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान डॉ. व्यंकटेश काबडे यांनी त्यांच्या मृत्यूची घोषणा केली. अहमदपूरकर महाराज यांच्या शरीरातील ऑक्सिजन स्तर खूप कमी झाला होता. तसेच श्वास घेण्यास त्यांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.