कोल्हापूर, २४ मे, (हिं.स) कोल्हापूरजवळ पुणे – बंगळुरु महामार्गावर कंटेनरला
ट्रॅव्हल्सने जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात एकाच मृत्यू झाला असून १५
जण जखमी झाले आहेत. यातील तिघे जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचाराकरिता
सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
हा अपघात टोप-संभापूरजवळ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कंटेनरला ट्रॅव्हल्सने
जोरात धडक दिली. त्यानंतर मागून भरधाव येणा-या ओमनीची धडक ट्रॅव्हल्सला बसली.
अपघातानंतर पुणे- बंगळुरु महामार्गावर
मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.
