अमरावती, 24 मे (हिं.स.)।
पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा व आतंकी अड्डयांचा खात्मा करणाऱ्या भारतीय संरक्षण दलाच्या गौरव पूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.याच अनुषंगाने दर्यापूर शहरात जे डी पाटिल महाविद्यालय ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या दरम्यान तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
यावेळी भारत माता की जय…!वंदे मातरम..! अशा घोषणांनी दर्यापूर शहर दणाणले होते.यावेळी उपस्थित नागरिकांच्या वतीने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी व त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
