Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डेहराडूनमधील ‘राष्ट्रपती निकेतन’ 24 जूनपासून सर्वसामान्यांसाठी होणार खुले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

डेहराडूनमधील ‘राष्ट्रपती निकेतन’ 24 जूनपासून सर्वसामान्यांसाठी होणार खुले

admin
Last updated: 2025/05/25 at 4:10 PM
admin
Share
3 Min Read
Oplus_16908288
SHARE

नवी दिल्‍ली, २५ मे (हिं.स.) : उत्तराखंडमधील डेहराडून येथील राष्ट्रपती निकेतन हे राष्ट्रपतींचे विश्रांतीचे स्थान, 24 जूनपासून सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुले केले जाणार आहे. राष्ट्रपतींच्या विश्रांतीचे हे स्थान 186 वर्षे जुने असून, ते 21 एकर क्षेत्रात विस्तारले आहे. राष्ट्रपती तसेच राष्ट्रपती भवनाच्या वारशाबाबत नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ते सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुले केले जात आहे. या उपक्रमांतर्गत, 2023 पासून, नवी दिल्ली इथले राष्ट्रपती भवन, हैदराबाद मधील राष्ट्रपती निलयम आणि माशोब्रा इथले राष्ट्रपती निवास सर्वसामान्यांना पाहण्यासाठी आठवड्यातून सहा दिवस खुले केले जाते. या उपक्रमाअंतर्गत फेब्रुवारी 2025 पासून, राष्ट्रपती भवनाच्या दर्शनी भागात होणाऱ्या चेंज ऑफ गार्ड या समारंभाचे स्वरुपही बदलले असून, त्याकरता आसनक्षमताही वाढवली गेली आहे.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 20 जून रोजी राष्ट्रपती निकेतनला भेट देणार आहेत. या भेटीवेळी त्या, राष्ट्रपती निकेतन सर्वसामान्य लोकांसाठी खुले करण्याच्या तयारीचा आढावा घेतील. यानिमित्ताने त्या 132 एकर परिसरात नियोजित असलेल्या राष्ट्रपती उद्यान या पर्यावरणीय उद्यानाची पायाभरणीही करणार आहेत.

राष्ट्रपती निकेतन हे पूर्वी राष्ट्रपती आशियाना या नावाने ओळखले जात होते. ही वास्तू राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या घोड्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जात असे. आता या वारसा इमारतीत वास्तूच्या समृद्ध वारशाची झलक दाखवणाऱ्या निवडक कलाकृतींच्या संग्रहाचे प्रदर्शन मांडले आहे. ही वास्तू सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुली झाल्यावर अभ्यागतांना राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचे तबेले आणि घोडे पाहण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय या वास्तू परिसरातील लिली तलाव, रॉकरी तलाव, गुलाब उद्यान आणि पेर्गोला पाहण्याची संधीही अभ्यागतांना पाहता येणार आहे.

राष्ट्रपती निकेतन व्यतिरिक्त, लोक राजपूर मार्गावरील 19 एकरच्या घनदाट वनराईतील राष्ट्रपती तपोवन या परिसरालाही सर्वसामान्यांना भेट देता येणार आहे. इथे भेट देणाऱ्यांना इथले स्थानिक विस्तीर्ण वृक्ष, नागमोडी पायवाटा, लाकडी पूल, पक्षी निरीक्षणासाठी उंच मचाण आणि चिंतन तसेच ध्यानधारणेसाठीच्या शांत ठिकाणांचा अनुभव घेता येणार आहे. या परिसराला भेट देणाऱ्यांना रम्य पायवाटा, हंगामी फुले आणि स्थानिक पर्यावरणीय घटकांच्या नैसर्गाशी जोडण्याच्या उद्देशाने हा परिसर विकसित केला गेला आहे.

राष्ट्रपती उद्यान हे पुढच्या वर्षापासून सर्वसामान्य लोकांसाठी खुले केले जाणार आहे. या उद्यानाचे नियोजन करताना ते पर्यावरणाच्या विविध पैलुंचा अंतर्भाव असलेले आणि मनोरंजकात्मक मूल्य जपणारे असेल, अशा रितीने केले गेले आहे. त्याअनुषंगाने या उद्यानाअंतर्गत विविध संकल्पनाधारीत उद्याने असतील, यात एका फुलपाखरांच्या उद्यानाचा समावेश असेल. याशिवाय या परिसरात एक नयनरम्य तलाव, पक्षीगृह आणि लहान मुलांसाठी खेळण्याची जागाही विकसित केली जाणार आहे. याचबरोबर क्रीडा क्षेत्र, पायी चालण्याच्या मार्गिका, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅकचे नियोजनही या उद्यानाच्या आराखड्यात केले गेले आहे. या उद्यान परिसरात जलसंवर्धन व्यवस्थेचाही अंतर्भाव असेल, तसेच मोकळ्या जागेत शिकण्याचा अनुभव देणाऱ्या व्यवस्थाही उभारल्या जाणार आहेत. या सगळ्यातून पर्यावरणीय जागृती तसेच सक्रिय जीवनशैलीला चालना देण्यासोबतच कौटुंबिक संवादाला निसर्गाशी एकरुपतेची जोड देण्याचा उद्देश आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश
Next Article परेश रावल यांनी अक्षय कुमारला व्याजासहित पैसे केले परत

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?