नाशिक, 25 मे (हिं.स.)।
-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा व शहर कार्यकारिणीची आढावा बैठक जिल्हा प्रभारी आमदार रोहित दादा पवार, जिल्हा निरीक्षक सुनील भुसारा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई आग्रा हायवे वरील हॉटेल सूर्या येथे संपन्न झाली.
अत्यंत संघर्षाच्या काळात आपण सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवार सोबत आहात याचा आनंद होत असल्याचं मत आमदार रोहित दादा पवार यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात पक्ष संघटनेत होणाऱ्या बदलांबाबत कल्पना या आढावा बैठकीत देण्यात आली. आगामी होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींना गांभीर्याने घेण्याचा सल्ला रोहित दादा पवार यांनी दिला. सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नवीन बांधणी केली जाईल याबाबतचे आश्वासन देण्यात आले. येत्या 10 जून रोजी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल अशी माहिती देण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांची चर्चा करा व जर ते तयार असतील तर एकत्र निवडणुका लढवा आणि त्यांनी जर सहमती दर्शवली नाही तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करा अशी सूचना ् रोहित पवार यांनी दिली. पक्ष वाढीसाठी पक्ष बांधणी साठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीसाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे प्रदेश प्रवक्ते विलासजी लवांडे ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार , गोकुळ नाना पिंगळे नितीन नाना भोसले, सुरेश दलोड, बी वाय पगारे, दीपिका श चव्हाण, संगीता ताई पाटील, अनिताताई दामले, शाम हिरे, ् नितीन निगळ, मुन्नाभाई अन्सारी, उदय सांगळे, भगीरथ शिंदे , संजय चव्हाण, व शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
