Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

admin
Last updated: 2025/05/27 at 3:20 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 27 मे : सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या तीन दिवसांत तब्बल 12 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात 45 वर्षांत पहिल्यांदाच उजनी धरण ‘प्लस’ पातळीत पोहोचले आहे, ही एक ऐतिहासिक बाब मानली जात आहे.

Contents
उजनी धरणाची पातळी उणे २३ टक्क्यांवरून ‘प्लस’मध्येभीषण उन्हाळ्यानंतर दिलासाधरण प्रशासनाचे अंदाज  चुकीचा ठरला

उजनी धरणाची पातळी उणे २३ टक्क्यांवरून ‘प्लस’मध्ये

२१ मे रोजी उजनी धरणातील पातळी उणे २३ टक्क्यांवर गेली होती. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे पातळी वेगाने वाढून २७ मे रोजी ‘प्लस’मध्ये पोहोचली आहे. यामध्ये दौंड तालुक्यातून येणाऱ्या पाण्याचा १९ हजार क्युसेक्स आणि धरण परिसरातील पावसाचा ११ हजार क्युसेक्स विसर्ग महत्त्वाचा ठरला आहे.

भीषण उन्हाळ्यानंतर दिलासा

गेल्या महिन्यातील कडक उन्हामुळे शेतकऱ्यांसाठी सलग ६० दिवस दोन आवर्तने धरणातून सोडावी लागली होती. याशिवाय सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. परिणामी, १८ एप्रिल रोजी उजनी धरणाची पातळी ऐतिहासिक नीचांकी पातळीवर म्हणजेच उणे पातळीत गेली होती.

धरण प्रशासनाचे अंदाज  चुकीचा ठरला

धरणातील पातळी मे अखेरीस उणे ५० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र, अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे हा अंदाज चुकीचा ठरला आणि उजनी धरणाने इतिहास घडवला.

You Might Also Like

दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा

सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते

मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे

सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Solapur: Hundreds of women participate in Kumkumarchan ceremony for Operation Sindoor सोलापूर : ऑपरेशन सिंदूरसाठी शेकडो महिलांचा कुंकुमार्चन सोहळा
Next Article कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

Latest News

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे
महाराष्ट्र August 2, 2025
दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा
सोलापूर August 2, 2025
सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सोलापूर August 2, 2025
भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू
देश - विदेश August 2, 2025
नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड
देश - विदेश August 2, 2025
देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन
देश - विदेश August 2, 2025
रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला
महाराष्ट्र August 2, 2025
परभणी : फकीरा कादंबरीच्या १०५ प्रतींचे वाटप
महाराष्ट्र August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?