नवी दिल्ली, 27 मे : इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक राकेश गंगवाल यांचा मोठा निर्णय समोर आला आहे. गांगवाल इंडिगो कंपनीतील 3.4 टक्क्यांचे भांडवल विकणार आहेत. यातून त्यांना अंदाजे 6.831 कोटी रुपये मिळणार आहेत. गंगवाल आणि राहुल भाटिया यांच्यातील मतभेदामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राकेश गांगवाल आणि राहुल भाटिया यांनी 2006 मध्ये इंडिगो एअरलाइन्सची स्थापना केली होती. आता राकेश गंगवाल कंपनीतील आपली भागिदारी कमी करत आहेत. त्यांच्यासोबत चिंकारपू फॅमिली ट्रस्ट सुद्धा काही शेअर्स विकणार आहे. या ट्रस्टची देखभाल शोभा गंगवाल आणि जेपी मॉर्गन ट्रस्ट कंपनी करतात. गंगवाल आणि त्यांच्या ट्रस्टकडे इंडिगोचे जवळपास 13.5 टक्के शेअर्स आहेत. यातील 3.4 टक्के शेअर्स आता विकले जाणार आहेत. विक्रीसाठी असलेल्या प्रत्येक शेअरची किंमत 5.175 रुपये निश्चित करण्यात आली आहे. गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी आणि जे पी मॉर्गन इंडिया यांसारख्या मोठ्या कंपन्या हे शेअर्स विकायला मदत करत आहेत. या कंपन्या गुंतवणूकदार शोधतील आणि विक्रीचा व्यवहार पूर्ण करतील.
या व्यवहारात एका शेअरची किंमत 5.175 रुपये असणार आहे. ही किंमत सोमवारी शेअर बाजार बंद झाला, त्यावेळच्या किमतीपेक्षा 4.5 टक्क्यांनी कमी आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना हे शेअर्स स्वस्त दरात मिळतील. राकेश गंगवाल हळूहळू इंडिगोमधील आपले भांडवल कमी करत आहेत. एकेकाळी गंगवाल आणि भाटिया हे इंडिगोचे सर्वात मोठे प्रवर्तक होते. पण आता गंगवाल आपला हिस्सा विकत असल्यामुळे कंपनीतील त्यांची भूमिका कमी होणार आहे. राकेश गंगवाल सध्या अमेरिकन बजेट कॅरियर साउथवेस्टच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 2022 मध्ये इंडिगोच्या बोर्डातून राजीनामा दिला होता. ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’मधील काही नियम बदलण्यागंगवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 2022 मध्ये इंडिगोमधील त्यांचा हिस्सा 36.6 टक्के होता, तो आता 13.5 टक्के पर्यंत कमी केला आहे. याचा अर्थ त्यांनी मोठ्या प्रमाणात आपले शेअर्स विकले आहेत.वरून त्यांचे राहुल भाटिया यांच्याशी वाद झाले होते.—————–