कर्जत, 4 जून (हिं.स.) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
महेंद्र थोरवे यांची सकल चौकशी करावी. माझ्याकडे पोलीस स्टेशनच्या सर्व गोपनीय एंट्री आहेत. ज्या मी माहितीच्या अधिकारातून प्राप्त केल्या आहेत. त्यांचा प्रशासनावर असलेल्या दबाव याला कारणीभूत फक्त महेंद्र थोरवे आहेत. कर्जत खालापूरचा तर नाही संपूर्ण रायगडचा वाल्मीक कराड हा महेंद्र थोर्वेच आहे.
एमआयडीसीवर असलेले दबाव याचा पुरावा मी देतो. याला कारणीभूत महेंद्र थोरवे आहेत. याची गृहमंत्र्यांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी करीत आहे. तसेच मी निवडणूक पिटीशन दाखल केली आहे. सध्या त्यांच्यावर तांगती तलवार आहे. लवकरच त्याचा निकाल लागेल व आमच्या पक्षाच्या बाजूने तो निकाल सकारात्मक आहे.
—————