रायगड, 4 जून (हिं.स.) – भारतातील सर्वात मोठी खाजगी ट्रान्समिशन आणि वितरण करणारी कंपनी आणि जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या अदानी समूहाचा भाग असलेली अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (एईएसएलला), हिने महाराष्ट्रात 1,660 कोटींचा आंतरराज्यीय ट्रान्समिशन प्रकल्प मिळविला असल्याची माहिती आज दिली. या नवीन ऑर्डरमुळे एईएसएलच्या ट्रान्समिशन ऑर्डरबुकची एकूण किंमत आता सुमारे 61,600 कोटी झाली आहे. (https://adani.service-now.com)
या प्रकल्पामध्ये 3,000 मेगा व्होल्ट-अँपिअर्स (एमव्हीए) क्षमतेचे सबस्टेशन्स आणि इतर संबंधित ट्रान्समिशन इंफ्रास्ट्रक्चर उभारण्याचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे एईएसएलचं एकूण ट्रान्समिशन नेटवर्क 26,696 सर्किट किलोमीटर (सीकेएम) आणि ट्रान्सफॉर्मेशन क्षमतेसह 93,236 एमव्हीएवर पोहोचेल. एईएसएल हा प्रकल्प जानेवारी 2028 पर्यंत पूर्ण करणार आहे.हा प्रकल्प विशेष उद्देशासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनी (स्पेशल पर्पज वेहिकल – एसपीव्ही) डब्ल्यूआरएनईएस तळेगाव पावर ट्रान्समिशन लिमिटेडच्या अंतर्गत येतो.
या प्रकल्पामुळे रायगड भागातील हायड्रो पंप्ड स्टोरेज प्रकल्पांमधून निर्माण होणारी 1.5 गीगावॅट ग्रीन ऊर्जा मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये पोहोचवता येणार आहे. आज एईएसएलला या प्रकल्पाचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले.हा आंतरराज्यीय ट्रान्समिशन प्रणाली (इंटर स्टेट ट्रान्समिशन सिस्टीम – आयएसटीएस) प्रकल्प टॅरिफ बेस्ड कॉम्पेटिटिव्ह बिडिंग (टीबीसीबी) यंत्रणेद्वारे जिंकण्यात आला असून, आरईसीपीडीसीएल(आरईसी पॉवर डेवलपमेंट अँड कंसल्टंसी लिमिटेड) या संस्थेने या निविदा प्रक्रियेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.