अहिल्यानगर, 5 जून, (हिं.स.) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा गरजा लक्षात घेता आणि टिकाऊ शेतीय दृष्टीकोनाचा उद्देश्याने डीसीएम श्रीराम लिमिटेडच्या विभाग असलेल्या श्रीराम फ़ार्म सोल्युशन्स ने त्यांची नव्या युगातील विशेष वनस्पती पोषण उत्पादने शेतकऱ्यांसाठी आणली आहे. समूहाचे कार्यकारी संचालक संजय छाब्रा यांनी दिली.
आधुनिक अशी द्रव्य खते श्रीराम पिकासोल आणि श्रीराम मैगनिका असे या खतांची नावे असून पेटंट केलेल्या तंत्रज्ञानाचा माध्यमाने दोन्ही उत्पादने बायोॲक्टिव टायटॅनियम असलेली भारतातील पहिलीच उत्पादने आहेत. याबाबत समूहाचे कार्यकारी संचालक आणि व्यवसायिक प्रमुख असलेले संजय छाब्रा यावेळी म्हणाले की,श्रीराम फ़ार्म सोल्युशन्स हा शेतीय कल्पकतेमध्ये स्वत:ला अधिकाधिक सक्षम बनवत असताना, या नव्या युगाची उत्पादने कंपनीची विज्ञानावर उपाय योजना देऊन शेतकऱ्यांना सबळबनविण्याची बांधिलकी दर्शवून देतात, ही उत्पादने त्यांचा वाढत्या गरजा आणि टिकाऊ शेतीय सवयींसंदर्भातील गरजा देखील भागवतात.
ते पुढे म्हणाले की, टायटॅनियममुळे वनस्पतीचा पर्यावरणाप्रती असलेला प्रतिकार वाढतो, ज्यामुळे वनस्पतीची आवश्यक पोषण घेण्याची क्षमता सुधारते आणि शेतकऱ्याला चांगले पीक मिळते. श्रीराम पिकासोल चा प्रमुख हेतू हा फ़ळाचा रंग आणि आकाराचा समानतेवर भर देण्याचा आहे तर श्रीराम मैगनिका चा हेतू हा फ़ळातील त्रुटी कमी करून त्याचे आयुष्य वाढविण्याचा आहे. द्राक्ष आणि डाळिंबा सारख्या, या भागातील विशेष पिकांकरिता, कंपनीने स्वत: संशोधन करून विकसित केलेल्या फ़र्टिगेशन उपाययोजना या प्रिमियम आणि निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्ष आणि डाळिंबासाठी आहेत , “श्रीराम ड्रिपिट ग्रेप्स” तसेच ”श्रीराम ड्रिपिट पोम” ची निर्मीती ही शेतकरी समूदायामध्ये एक विशेष आकर्षण ठरले आहे. मागील वर्षी श्रीराम ट्रेक्सटर सारख्या कल्पक किटनाशकाचा सादरीकरणाने कंपनीला हजारो शेतकरी आणि चॅनल पार्टनर्सकडून सकारात्मक अशा प्रतिक्रिया मिळाल्या.
चॅनल पार्टनर्सना जपान येथे पेटन्ट आणि विकसित केलेल्या श्रीराम सायशो नामक किटकनाशकाचा प्री-कमर्शीयलायझेशन चाचण्यांचे अतिशय कौतुक वाटले. तणाचा व्यवस्थापनाकरिता आणि किटकनाशकांचा उत्पादनामधील संख्या वाढाव्या म्हणून , कंपनीने ‘श्रीराम एकराईटर’ नामक उत्पादन सादर केले आहे जे एक विशेष असे तणनाशक असून त्याची निर्मीती ही मका आणि ऊसामधील त्रासदायक अशा तणाचा नाश करण्याकरिता करण्यात आलेली आहे. अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.