Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ मोहीमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा पुढे ढकलले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ मोहीमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा पुढे ढकलले

admin
Last updated: 2025/06/11 at 3:56 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 11 जून (हिं.स.)।भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे ‘अ‍ॅक्सिओम-४’ मिशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. ‘स्टॅटिक फायर’ चाचणीनंतर बूस्टरच्या तपासणीदरम्यान यानात लिक्वीड ऑक्सिजन गळती आढळून आल्यानंतर मोहिमेवर ब्रेक लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

ऑक्सिजन गळतीमुळे स्पेसएक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी नियोजित अ‍ॅक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलल्याची पुष्टी केली आहे. हे मिशन बुधवारी(११ जून) सांयकाळी ५.३० वाजता प्रक्षेपित होणार होते. दरम्यान, ऑक्सिजन गळतीची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आणि रेंज उपलब्धतेनुसार नवीन प्रक्षेपण तारीख शेअर केली जाईल, असेही स्पेसएक्सने सांगितले. या मोहिमेअंतर्गत, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर आयएसएसमध्ये जाणार आहेत.

शुभांशू शुक्ला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि नासा समर्थित अ‍ॅक्सिओम स्पेसच्या व्यावसायिक अंतराळयानाचा भाग आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, बुधवारी(दि.११) सांयकाळी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून यान आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे १४ दिवसांच्या प्रवासासाठी निघणार होते, मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहे.

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची २०१९ मध्ये गगनयान मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीर संघात निवड झाली आहे. हे गगनयान २०२७ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. शुभांशू शुक्ला यांचा हा अंतराळ प्रवास भारताच्या मानवी अंतराळ उड्डाणाच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल.शुभांशू शुक्ला सुमारे ४१ वर्षांनी एक भारतीय म्हणून अवकाशा यात्रा करणार होते. यापूर्वी राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या इंटरकॉसमॉस मोहिमेद्वारे ८ दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली होती.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; बच्चू कडू यांची प्रकृती खालावली
Next Article भारतीय विद्यार्थ्याच्या मारहाण प्रकरणी अमेरिकेने दिले स्पष्टीकरण

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?