सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 60 हजार 421 जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 18 हजार 882 वर गेली असली तरी दिलासादायक बाब म्हणजे त्यातील 14 हजार 242 जणांनी उपचार घेऊन कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. थोडक्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण जादा आहे.
सोलापूर जिल्ह्यात 14 हजार 242 जणांनी मात केली असून उर्वरित 3 हजार 871 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 2 हजार 914 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 503 जण निगेटिव्ह, तर 411 जण पॉझिटिव्ह आढळले. विविध गावांत 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 166 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सोलापूर शहरात 406 जणांची तपासणी झाली. त्यापैकी 361 निगेटिव्ह, तर 45 जण पॉझिटिव्ह आढळले. 196 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बुधवारी मृत्यू झालेल्यांमध्ये पंढरपूर शहरातील संत पेठ भागातील 60 वर्षीय पुरुष, बार्शी तुलक्यातील चुंब येथील 71 वर्षीय पुरुष, करमाळा शहरातील दगडी रोड भागातील 70 वर्षीय पुरुष, मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथील 73 वर्षीय महिला, पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील 65 वर्षीय महिला, तर माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सोलापूर शहरातील शिवाजीनगर केगाव परिसरातील 58 वर्षीय पुरुष, सुविद्यानगर विजापूर रोड परिसरातील 88 वर्षीय पुरुष, तर एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
बुधवारअखेर जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 421 जणाची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 60 हजार 92 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 41 हजार 210 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी 234 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यात 12 हजार 125, तर शहरात 6 हजार 757 असे एकूण 18 हजार 882 जण कोेरोनाबाधित आढळले. त्यापैकी जिल्ह्यातील ग्रामीण भागात 349, तर सोलापूर शहरात 420 जणांचा अशा एकूण 769 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील 3 हजार 110 आणि शहरातील 761 अशा एकूण 3 हजार 871 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 8 हजार 666 आणि शहरातील 5 हजार 576 असे एकूण 14 हजार 242 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, आवाहन करण्यात आले आहे.