Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी राजकीय पक्षांकडून विशेष बस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी राजकीय पक्षांकडून विशेष बस

admin
Last updated: 2025/06/12 at 4:20 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 12 जून (हिं.स.)। महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी मोफत प्रवास घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी चालवण्यासह एसटी व खासगी बस आरक्षित करण्यात येणार आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे मतदारांना विशेषत: चाकरमान्यांना खूश करण्यासाठी येणार्‍या काळात राजकीय पक्षांचे प्रयत्न राहणार आहेत. निवडणुकीपूर्वी गणेशोत्सव येत असल्यामुळे यावेळी भाजपासह शिवसेना, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात विशेष बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय या बस चालवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजकीय पक्षांच्या मोफत गाड्यांची घोषणा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. या गाड्यातून मोफत प्रवास करण्यासाठी चाकरमान्यांना आगाऊ आसन आरक्षित करावे लागणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

भाजपाने मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात एक हजारापेक्षा जास्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. अतिरिक्त बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भाजपाने एसटी महामंडळाला राज्याच्या विविध जिल्ह्यातून बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या बस उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एसटी महामंडळाला पत्र दिले जाणार आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असल्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह विशेष गाड्याही हाउसफुल होतात. त्यामुळे राजकीय पक्षांमार्फत सोडण्यात येणार्‍या बसचा चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे. एसटी बसची संख्या अपुरी पडल्यास खासगी बसही भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. तशी विचारनाही खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे करण्यात आली आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देशाच्या विविध राज्यांत उष्णतेची लाट
Next Article लोणावळा आणि मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळावंर बंदीचे आदेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?