Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अहमदाबाद विमान दुर्घटना : हवाई वाहतूक मंत्र्यांकडून दुःख व्यक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अहमदाबाद विमान दुर्घटना : हवाई वाहतूक मंत्र्यांकडून दुःख व्यक्त

admin
Last updated: 2025/06/12 at 6:13 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहमदाबाद, 12 जून (हिं.स.)।अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण दुर्घटनेबद्दल केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी तीव्र दुःख आणि चिंता व्यक्त केली.तसेच त्यांनी या घटनेला “अत्यंत विनाशकारी” संबोधले असून तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू असल्याचे देखील म्हटले आहे.

हवाई वाहतूक मंत्र्यांनी सांगितले की, ते स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला आणि मन सुन्न झाले आहे.”आम्ही अत्यंत सतर्क आहोत. मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व हवाई वाहतूक आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणांना त्वरित आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बचाव पथके रवाना करण्यात आली असून, अपघातस्थळी वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. माझ्या भावना आणि प्रार्थना विमानातील सर्व प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत,” असे राम मोहन नायडू किंजरापू यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

एअर इंडियाने ‘एक्स’ वर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “एअर इंडियाची फ्लाईट AI171, अहमदाबाद-लंडन गॅटविक दरम्यान कार्यरत असताना आज, १२ जून २०२५ रोजी एका दुर्घटनेत सापडले. सध्या आम्ही तपशील गोळा करत असून, अधिक माहिती https://airindia.com आणि आमच्या एक्स हँडलवर लवकरात लवकर दिली जाईल”.

माहितीनुसार, लंडनला जाणारे एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच कोसळले. विमानात २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. या दुर्घटनेत अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक जखमींना शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आपत्कालीन प्रतिसाद पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी वेगाने बचाव, निर्वासन आणि अग्निशमन कार्य सुरू केले आहे. “आम्ही मृतांबद्दल आणि जखमींबद्दल अधिक माहिती गोळा करत आहोत,” असे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी सांगितले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लोणावळा आणि मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळावंर बंदीचे आदेश
Next Article मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?