Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी

admin
Last updated: 2025/06/12 at 6:37 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 12 जून (हिं.स.)

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या ८ जूनपासून गुरूकूंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपोषणस्थळी बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

राजू शेट्टी म्हणाले, राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरीही या निर्दयी सरकारला जाग येत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा कमी किमतीत खुल्या बाजारात विकावे लागले. क्विंटलमागे हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. जर उद्योगपतींना पाम तेल आयात करण्यासाठी सूट दिली नसती, तर सोयाबीनला चांगले भाव मिळाले असते. पण, हे सरकार उद्योगपतींचे आहे. आम्ही काही अशक्य अशा मागण्या केल्या नाहीत. त्या पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे. सरकारने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी, शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नये. आम्हालाही आता निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. येत्या १४ जूनपर्यंत सरकारने मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास राज्यात चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही. कडेकोट बंद पुकारला जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुर्तिजापूरच्या प्रचार सभेत घोषणा केली होती. पण, त्याचे पुढे काय झाले. अजित पवार म्हणतात, राज्याची आर्थिक स्थिती ठिक नाही. पण, याच अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी वाहनातला एसी बिघडला म्हणून गाड्या बदलण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. एकवेळ बुलेट ट्रेनचे काम थांबवा, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशी आमची मागणी आहे. तीही पूर्ण करणार नसाल, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले.

राजू शेट्टी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, बावनकुळे यांना वाळू माफियाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हेलिकॉप्टर घेऊन जाता येते, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करणाऱ्या बच्चू कडूंची साधी भेट घेता येत नाही. त्यांना याची लाज कशी वाटत नाही, असा सवाल शेट्टी यांनी केला.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी
Next Article अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?