मुंबई, 14 जून (हिं.स.)।
छत्रपती
शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वे
रविवारी ब्लॉक घेणार आहे. तर पश्चिम रेल्वे सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या
मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नल आणि ओव्हरहेड
वायरच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या
रद्द करण्यात येणार आहेत. तर काही लोकल विलंबाने
धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि
डाऊन धीम्या मार्गावर
सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ ब्लॉक घेण्यात येणार
आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५
ते दुपारी ४.०५ या वेळेत हा ब्लॉक घेतला जाईल. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवर
सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ ही मेगा
ब्लॉकची वेळ असणार आहे.
