अहमदाबाद, 14 जून, (हिं.स.)। अहमदाबादमध्ये
झालेल्या एअर इंडिया १७१ विमान अपघातात मृतांचा आकडा वाढून २७४ वर पोहचला आहे. मृतांमध्ये
प्रवासी, कर्मचारी
आणि बीजे मेडिकल कॉलेजमधील व्यक्तींचा समावेश आहे. बचाव पथकांनी ब्लॅक बॉक्स शोधून
काढला आहे. जो आपत्तीचे कारण निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याप्रकरणी चौकशी
सुरू झाली आहे. अधिकारी अपघातामागील संभाव्य घटक म्हणून तांत्रिक आणि मानवी
चुकांचा शोध घेत आहेत.
शुक्रवारी
बचाव पथकाला बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरच्या ढिगाऱ्यातून २९ मृतदेहांसह एआय १७१
विमानाचा ब्लॅक बॉक्स बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.भारतीय
विमान वाहतूक इतिहासातील सर्वात भीषण अपघातात एकाच विमानातील दुर्घटनेतील मृतांची
संख्या २७४ झाली आहे. विमानातील २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या
मृतांची संख्या वाढत असल्याने, उर्वरित
३३ बळी हे अपघाताच्या वेळी अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये
उपस्थित असलेले नागरिक असल्याची माहिती आहे. त्यामध्ये डॉक्टर, विद्यार्थी, रुग्णालय
कर्मचारी आणि मेघनीनगर परिसरातील स्थानिक रहिवासी असल्याचा अंदाज आहे.
मेडिकल
कॉलेज कॅम्पसमधील युजी आणि पीजी विद्यार्थ्यांच्या मेस इमारतीच्या छतावर फ्लाइट
डेटा रेकॉर्डर अर्थातच एफडीआर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच सीव्हीआर असलेला
ब्लॅक बॉक्स सापडला असल्याचे पोलिसांनी सांगतिले आहे.
