अमरावती, 15 जून, (हिं.स.)सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानदार साफसफाई करित असताना दोन ढोंगी साधून दुकानात आले. साधूने दुकानदाराला पुडीत १०० रूपये व रूद्राक्ष बांधून दिले. गळयातील चैनला हात लावून राख पाडल्याने दुकानदाराचा साधूंवर विश्वास बसला. परंतु, साधूने डोक्यावर हात ठेऊन आशिर्वाद देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याच्या गळयातील १० ग्रॅमची ६० हजाराची सोन्याची चैन लंपास केली. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बच्छराज प्लॉटमध्ये ही घटना घडली.
श्लोक सतीश गुप्ता (२७)रा. बच्छराज प्लॉट असे फसवणूक झालेल्या तक्रारदारांचे नाव आहे. माहितीनुसार, श्लोक गुप्ता यांचे बच्छराज प्लॉटमध्येच कपडयाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे श्लोक यांनी १३ जून रोजी सकाळी दुकान उघडले आणि ते नोकरासोबत मिळून दुकानाची साफसफाई करित होते. तेवढ्यात दोन अज्ञात साधू त्यांच्या दुकानात आले. साधूंनी चहा मागिल्याने श्लोक यांनी नोकराला चहा आणण्यासाठी बाहेर पाठविले. श्लोकने दोन्ही साधूंच्या पाया पडून त्यांना १० रूपये दक्षिणा दिली. साधूंनी ते १० रूपये, खारिक व रूद्राक्ष एका पुडीत बांधून श्लोक यांना दिले. थेोळयावेळी डोळे बंद कर आणि नंतर पुडी उघडून पहा, असे सांधूनी श्लोकला म्हटले.
श्लोकने थोळयावेळ डोळे बंद करून पुढील उघडली असता त्यामध्ये १०० रूपये, १० चा कॉईन, रूद्राक्ष, कॉईन दिसल्याने श्लोकला सांधूंवर विश्वास बसला. श्लोक पुन्हा साधूच्या पाया पडण्यासाठी वाकला असता सांधूनी त्याच्या गळ्यातील सोन्याच्या चैनला हात लावून राख पाडली आणि तीराख उचलून पुडीत बांधून श्लोकलादिली. त्यानंतर साधून श्लोकला त्याच्या कॅबीनच्या खुर्चीमध्ये त्याला बसवून तेथून निघून गेले. परंतु, थाळया वेळाने गळ्यातील चैन लंपास झाल्याचे लक्षात येताच श्लोक गुप्ताने तात्काळ कोतवाली पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी दोन अज्ञात साधूंविरोधात गुन्हे दाखल केले असून पोलिस पुढील तपास करित आहेत.