Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अनेक संकटे झेलत शेतकऱ्यांनी केली मशागतीला सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अनेक संकटे झेलत शेतकऱ्यांनी केली मशागतीला सुरुवात

admin
Last updated: 2025/06/15 at 3:28 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 15 जून (हिं.स.)

दिवसभर काळ्या मातीत राबराब राबणे, हे बळीराजाच्या आयुष्यालाच लागले आहे. जगाचा पोशिंदा कुटुंबासह शेतात कायम घाम गाळीत आला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला बरसलेल्या पावसाने बळीराजा नव्या उमेदीने कामाला लागला आहे. लाखनी तालुक्यातील किटाडी येथील कोरडवाहू शेतशिवारात खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

निसर्गही साथ देत नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती झेलत निसर्गाच्या आशेवर वार्षिक अंदाज बांधत नियोजन करणारा बळीराजा यंदा तरी शेतातून भरघोस उत्पन्न पदरी पडेल या आशेवर खरिपातील पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेण्याच्या घाईत दिसत आहे. वाढत्या महागाईचे चटके सहन करीत ऊन-पावसाची पर्वा न करता बळीराजा आपल्या कारभारणीसह शेतात कामे करीत आहे. निसर्गाच्या भरवशावर लाखो रुपयांचा सट्टा खेळणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने साथ दिली, तर आपले दारिद्रय दूर होईल, अशी अपेक्षा आहे. शेतीकामांना सुरुवात झाल्याने शेतमजुरांना रोजगार मिळू लागला आहे. शेतशिवार शेतकरी व मजुरांनी फुललेले दिसत आहे. आधुनिक यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झाले आहे.

कृषी सेवा केंद्रावरही गर्दी

मृग नक्षत्राची सुरुवातच पावसाने झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी वाढू लागली आहे. चांगल्या प्रतीच्या बियाणांना अधिक मागणी आहे.

शेतात ही कामे सुरू

उन्हाळ्याच्या उत्तरार्धात शेतात शेणखत टाकणे, केरकचरा पेटविणे, पाळे-धुरे कचरामुक्त करून नीटनेटके करणे, धुऱ्यांवरील तूर पिकांची जुनी मुळे उपटणे, धुन्ऱ्यांवर माती टाकून त्यात तीळ व तूर लावणे, यासह शेत नांगरणे, वखरणे पन्हे टाकण्यासाठी जागा तयार करणे, शेतातून जनावरांचे वैरण घरी आणणे या कामांची लगबग सुरू आहे.

आधुनिक शेतीला प्राधान्य

अलीकडे शेतीकामासाठी आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर अधिकाधिक होत असल्याने बैलजोडीचे महत्त्व हळूहळू कमी होत आहे. यामुळे साहजिकच पारंपारिक लाकडी शेती अवजारे दिसेनाशी होत आहेत. परिणामी, बैलजोडीच्या धुंगूरमाळांचा आवाज लयास गेला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमरावती – दोन साधुंनी उडवली व्यापाऱ्याची चैन
Next Article खा. प्रणिती शिंदेचा स्वबळाचा नारा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?