सोलापूर, 15 जून (हिं.स.)।
लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मतदार संघात मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर खा. प्रणिती शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी पदरात पडली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडल्याने विधानसभेला काँग्रेसचा पराभव झाला.अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा केली.
मात्र विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच झलक दाखवल्यास विधानसभेची पुनरावर्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीचे प्रभाग रचना सदस सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी गती घेतली आहे.