Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लखनऊ विमानतळावर मोठा अपघात टळला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

लखनऊ विमानतळावर मोठा अपघात टळला

admin
Last updated: 2025/06/16 at 4:25 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सौदीच्या विमानातील 282 हजयात्री सुरक्षित

लखनऊ, 16 जून (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथे मोठी विमान दुर्घटना टळली. सौदी एअरलाईन्सचे विमान लँड झाल्यानंतर विमानाच्या चाकातून ठिणग्या आणि धूर निघू लागला. त्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत एटीसीला माहिती दिली आणि संभाव्य अपघात टळला. या विमानातील जेद्दाहहून येणारे 282 हज यात्रेकरू सुरक्षित आहेत.

यासंदर्भातील माहितीनुसार, सौदी अरेबियन एअरलाइन्सचे विमान (एसव्ही-3852) शनिवारी रात्री जेद्दा विमानतळावरून लखनऊसाठी निघाले होते. या विमानात २८२ हज यात्रेकरू प्रवास करत होते. हे विमान रविवारी सकाळी 6.30 वाजता अमौसी विमानतळावर उतरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रन-वेवर यशस्वी लँडिंगनंतर विमान टॅक्सी-वेकडे जात असताना अचानक त्याच्या डाव्या बाजूच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या. ही बाब लक्षात येताच पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) याची सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने फोम आणि पाण्याचा मारा करून केवळ 20 मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली. या सर्व प्रकारामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमानाला पुश बॅक करून टॅक्सी-वेवर आणण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

प्रवाशांना सुखरूप उतरवल्यानंतर अभियंत्यांच्या पथकाने विमानाच्या चाकातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत हा बिघाड दुरुस्त होऊ शकला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या लँडिंग दरम्यानच डाव्या बाजूच्या चाकात बिघाड झाला होता. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये लिकेज झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या होत्या.

विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता आणि अभियंत्यांचे पथक तो दुरुस्त करत आहे. विमानातील बिघाड दुरुस्त होताच ते जेद्दासाठी रवाना केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चला ! डेंग्यूवर जागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करा
Next Article समिती कशाला, थेट कर्जमाफी का नाही ? – यशोमती ठाकूर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?