Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमरावती : विज कापल्याने महावितरणच्या अभियंत्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अमरावती : विज कापल्याने महावितरणच्या अभियंत्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

admin
Last updated: 2025/06/16 at 4:28 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 16 जून (हिं.स.)

विजबिल थकीत असल्याने महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने दोन आरोपींच्या घराचा विज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे आवेशात अतिशय मद्यधुंद अवस्थेत असलेले दोन्ही आरोपीं चक्क पेट्रोलने भरलेली कॅन घेऊन महावितरणच्या कार्यालयात शिरले आणि सहाय्यक अभियंत्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. जिव वाचविण्यासाठी अभियंता तेथून पळाल्याने आरोपींनी त्यांच्या टेबलाला आग लावल्याने टेबलावरील कागदपत्रे व संगणक जळून खाक झाले.

वलगाव येथील महावितरणच्या कार्यालयातही घटना घडली असून याबाबत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महावितरण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वलगाव येथील महावितरणच्या तक्रारकर्त्याचे नाव गोपाल विनायक इंगळे (वय ३८) आहे. तर अटकेतील आरोपींची नावे अविनाश गोवर्धन झाले. निर्मळ (वय ३३) व विनित दिलिपराव तायडे (वय ३३) दोन्ही रा. वलगाव अशी आहेत.

माहितीनुसार, आरोपींच्या घराचे वीजबिल गेल्या अनेक महिन्यापासून बाकी होते. वलगाव महावितरणचे भरारी पथकाचे प्रमुख व वसूली मोहिम प्रमुख सहाय्यक अभियंता इंगळे यांनी अनेकवेळी दोन्ही आरोपींना विजबिल भरण्यासाठी तडजोड रक्कम आकारून दिली. परंतु, आरोपींनी मुदत संपल्यानंतरही तडतोड रक्कम न भरली नाही. त्यामुळे महावितरणने आरोपींच्या घराचा विज पुरवठा पोलवरून खंडीत केला. जेव्हा महावितरणच्या पथकाने ही कारवाई केली, तेव्हाच आरोपींनी प्रचंड राडा केला होता. तरी देखील महावितरणच्या पथकाने विज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई पूर्ण केली. त्यामुळे दोन्ही आरोपी प्रचंड चिडलेले होते.

रविवारी दुपारी दोन्ही आरोपी अतिशय मद्यधुंद अवस्थेत हातात पेट्रोलने भरलेली कॅन घेऊन वलगाव महातिवरणच्या कार्यालयात दाखल आरोपींनी प्रचंड धुमाकूळ घालत थेट सहाय्यक अभियंत्याच्या अंगावर व टेबलावर पेट्रोल ओतले. लगेच अभियंता तेथून पळून गेले. अभियंता पळून गेल्याने आरोपींनी त्यांच्या टेबलाला आग लावली. आगीत टेबलावरील संगणक, महत्त्वाची कागदपत्रे व फाईल्स पूर्णतः जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांर्भीय लक्षात घेता वलगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींची शोधमोहिम राबवून त्यांना अटक केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींची इर्विनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article समिती कशाला, थेट कर्जमाफी का नाही ? – यशोमती ठाकूर
Next Article जातनिहाय जनगणनेसाठी केंद्राकडून अधिसूचना जारी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?