Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे

admin
Last updated: 2025/06/16 at 5:59 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

सातारा, 16 जून (हिं.स.)।

शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य , संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव 205-26 चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत माझी शाळा आदर्श शाळा उपक्रांतर्गत उभारण्यातत आलेल्या शाळेचेही उद्घाटन शिंदे यांनी केले. या प्रसंगी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवित आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उच्च पदावर काम करित आहेत. माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जी. अब्दुल कलाम, राष्ट्रती द्रौपदी मुर्मू, भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानींही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेतलेले आहे.

शासनाचा आनंददायी शिक्षणावर भर आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे. सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम हा राज्यभर राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागात अमुलाग्र बदल केले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्ताराचे ओझे कमी करणे, आनंददायी शिक्षण, मुलींना उच्च शिक्षण मोफत यासह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा व संघटीत व्हा असे सांगतले होते. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देशाचा कारभार चालत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थी स्पर्धांमध्ये टिकले पाहिजेत अशा पद्धतीने त्यांना शिक्षणकांनीही दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवानही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी साधला चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद

कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. मुलांनो खूप अभ्यास करा मोठे व्हा असे आवाहन केले करुन आपण भविष्यात काय होणार यासाठी आत्तापासून तयारी करा, असे त्यांनी सांगितले.

माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम उत्तम प्रकारे राबविण्यात येत आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. परंतु शालेय शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कारही घडवावे, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत आज उच्च पदावर काम करीत आहेत. शिक्षकांनी आनंददायी शिक्षणावर भर द्यावा. माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांर्गत शाळांना भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. शिक्षकांनी शिक्षणाची पायाभरणी भक्कम करावी म्हणजे शैक्षणिक इमारत भक्कम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद विविध शाळंमध्ये विविध उपक्रम राबविण्यात राज्यात अग्रेसर आहे. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत असून यामुळे जिल्हा परिषदेतील शाळांचा पट वाढला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी सांगितले.

या कार्यक्रमास शिक्षक, पालक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
Next Article मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?