Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ट्रम्प यांनी लाँच केला स्वतःच्या ब्रँडचा स्मार्टफोन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ट्रम्प यांनी लाँच केला स्वतःच्या ब्रँडचा स्मार्टफोन

admin
Last updated: 2025/06/17 at 6:25 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंगटन , 17 जून (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि. १७) आपल्या ब्रँडचा मोबाईल लाँच करत स्मार्टफोन बाजारात पाऊल टाकले आहे. ट्रम्प यांनी या मोबाईलला ट्रम्प मोबाईल १ असे नाव दिले असून याची सेवा येत्या सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

ट्रम्प यांची कंपनी ट्रंप ऑर्गनाइझेशनने सोमवारी(दि.१७) मोबाईल सेवा आणि ४९९ डॉलर किंमतीचा गोल्ड प्लेटेड स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईलला ट्रम्प मोबाईल १ असे नाव दिले आहे. ही सेवा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी 47.45 डॉलर प्रति महिना मोजावे लागणार आहेत. आता ट्रम्प यांच्यानुसार हा स्मार्टफोन अमेरिकेत उत्पादित होणार असून त्याचे कॉल सेंटरही अमेरिकेतच असणार आहेत. तसेच ट्रम्प मोबाईल सेवा लाँच केल्यानंतर यासाठी एक वेबसाईट देखील लाँच करण्यात आली आहे. यावरून हे मोबाईल मागविता येणार आहेत.

ट्रम्प मोबाईल ने T1 Phone लाँच केला आहे. या फोनवर अँड्रॉईड मिळणार आहे, भारतीय रुपयांत याची किंमत 42,893 रुपये ठेवण्यात आली आहे. डिस्प्ले AMOLED असून 6.8-इंच आहे, रिफ्रेश रेट 120Hz आहे. प्रायमरी कॅमेरा 50MP देण्यात आलेला आहे. तसेच 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये ५०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी एक्सपांडेबल मेमरी देण्यात आली आहे.

एवढेच नाही तर ट्रम्प मोबाईल सेवा देखील सुरु करत आहेत. यामध्ये ते महिन्याला 47.45 डॉलर भाडे घेणार आहेत. ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, यामुळे ही किंमत ठेवण्यात आली आहे. याचबरोबर 24/7 रोडसाइड असिस्टेंस, टेलीहेल्थ सर्विस, डिवाइस प्रोटेक्शनसह १०० हून अधिक देशांत मोफत कॉलिंग दिले जाणार आहे. याचसोबत अमेरिकेत वापरण्यासाठी अनलमिटेड कॉलिंग, टेक्स्ट आणि डेटा दिला जाणार आहे.

अमेरिकेत दरवर्षी सहा कोटींहून अधिक स्मार्टफोन खरेदी केले जातात. हे सर्व भारत, चीन सारख्या देशांत बनविले जातात. ट्रम्प यांनी गेल्याच महिन्यात अँपलसह सर्व स्मार्टफोन कंपन्यांना अमेरिकेतच स्मार्टफोन उत्पादित करा नाहीतर जादा टेरिफला तयार रहा असा इशारा दिला होता.परंतू, एकाही कंपनीने ट्रम्प यांना मनावर न घेतल्याने ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. आता या मोबाईलला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही : पुणे मनपा आयुक्त
Next Article सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?