सांगली : दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील व बंधू सुरेश पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आई आमदार सुमन पाटील यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली. दरम्यान काल तासगाव शहरात कोव्हीड हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने बरेच नेते रोहित पाटील यांच्या संपर्कात आले होते. यामुळे खळबळ माजली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तासगाव तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. आमदार सुमन पाटील यांच्यासह घरातील अन्य दोघेजण गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात होते. मतदारसंघातील अनेक कार्यकर्तेही अंजनी येथे आमदार व नेते रोहित यांना भेटण्यासाठी येत होते. आमदार सुमन पाटील यांच्यासह घरातील अन्य सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
आमदार सुमन पाटील यांच्यासह अन्य सदस्यांचा कोरोना चाचणी अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये आमदार पाटील यांची चाचणी निगेटिव्ह आली. पुत्र रोहित आणि बंधु सुरेश पाटील यांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत. काल बुधवारी तासगाव येथील कोव्हीड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी रोहित पाटील हे पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे संपर्कातील सर्वजणानी चाचणी करणार असल्याचे वृत्त आहे.