Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

admin
Last updated: 2025/06/18 at 8:31 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

विमानतळाची कसून तपासणी, धमकी पोकळ ठरली

हैदराबाद, 18 जून (हिं.स.) : तेलंगणाची राजधानी हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. ई-मेलवर मिळालेल्या या धमकीनंतर संपूर्ण विमानतळाची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर ही धमकी पोकळ अफवा असल्याचे सिद्ध झाले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याला आज, बुधवारी धमकीचा ई-मेल मिळाला. त्यात विमानतळ परिसरात बॉम्ब ठेवल्याचे म्हंटले होते. त्यानंतर विमानतळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ हैदराबाद पोलिसांना कळवले. शहराच्या मध्यभागी असलेल्या विमानतळावर बॉम्ब शोध पथक दाखल झाले. त्यानंतर विमानतळ परिसराची आणि त्याच्या आसपासची कसून तपासणी करण्यात आली. सखोल चौकशीनंतर पोलिस पथकांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अधिकाऱ्यांनी धमकीचा ई-मेल अफवा असल्याचे घोषित केले. ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत,

असे पोलिसांनी सांगितले. हैदराबादच्या शमशाबाद परिसरातील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंतराराष्ट्रीय व वाणिज्यिक विमानांचे संचलन होते. तर बेगमपेट विमानतळावर 2008 पासून केवळ चार्टर्ड विमाने आणि सैन्य विमानांचे संचलन होते. गेल्या 12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमानाचा अपघातानंतर एव्हीएशन क्षेत्रात संवेदनशीलता निर्माण झाली आहे. इंडिगोच्या कोच्ची-मुंबई विमानाला देखील मंगळवारी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्यानंतर या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर आज, बुधवारी बेगमपेट विमानतळाला बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. या दोन्ही घटनांमागे काही साधर्म्य आहे का याचा देखील तपास केला जातोय.

————————–

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
Next Article नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?